●● मानवतावादी शिवधर्म आणि ब्राह्मणी कळपाचा पर्दाफाश ●●
आजकाल ब्राह्मणी कळप शिवधर्म विषयी खुपच चुकीच्या पध्दतीने अफवा,अपप्रचार करुन शिवधर्माविषयी गैरसमज,दिशाभुल,बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न करत आहे.त्यामुळे अशा ब्राह्मणी अफवांचे खंडन करण्याचा हा प्रयत्न...
● ब्राह्मणी दिशाभुल १) हिंदुत्वाला शिव्या-शाप देणारे शिवधर्माचे संस्थापक खेडेकर आणि त्यांच्या शिव्या-शापाला मंचावर बसूनच टाळ्या वाजविणाऱ्या रेखाताई खेडेकर हिंदुत्ववादी भाजपाच्या आमदार झाल्या होत्या.
★ खंडन व उत्तर - मा.पुरुषोत्तम खेडेकर साहेब हिंदुत्वाला अपशब्द बोलत नसुन हिंदु धर्मात घुसखोरी करुन मुळचा मानवतावादी धर्म भ्रष्ट करुन धर्मात जात,वर्ण निर्माण करणाऱ्या ब्राह्मणी कळपाची हरामखोरी म्हणजेच ब्राह्मणत्वाला नागडे करतात.परंतु कपटी ब्राह्मणी कळप ब्राह्मणत्व म्हणजेच हिंदुत्व ही खोटी व्याख्या हिंदुत्वाबाबत रुढ करु पाहत आहेत.ही खुप गंभीर षडयंत्र आहे.समाजाने वेळीच जागृत होऊन चुकीचा अर्थ सांगणाऱ्यांचा प्रयत्न हाणुन पाडावा.
मा.रेखाताई खेडेकर या भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या त्यात भाजपाच्या योगदानापेक्षा मराठा सेवा संघ व समविचारी चळवळीचे योगदान सर्वाधिक होते.यात रेखाताईंना दुषण देण्यापेक्षा उलट भाजपला प्रश्न विचारायला हवा की RSS च्या विरोधकांना तुम्ही तिकीट देताच कसे ?
भाजपाला रेखाताईंव्यतिरिक्त लायकीची व्यक्ती तिकीटासाठी मिळाली नाही का ?
यात भाजपाचा स्वार्थ दिसत नाही का ?
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे तर नेहमी म्हणायचे "रेखाताई या भाजपाच्या आमदार नसुन त्या मराठा सेवा संघाच्या भाजपमधील आमदार आहेत.." ही मुंडेंनी दिलेली पोचपावती धर्मातील ब्राह्मणी ठेकेदारांची तोंडे बंद करायला पुरेशी आहे.
रेखाताई भाजप मधे आमदार असतानासुध्दा त्यांनी भाजपचा संघीय अजेंडा न राबवता मराठा सेवा संघाचाच मानवतावादी अजेंडा राबवला.विधानसभेत शिवजयंतीवर प्रश्न उपस्थित करुन दीर्घ चर्चेतुन शिवजयंतीची अस्सल तारीख १९ फेब्रुवारी निश्चित करुन घेतली.आज समाजात वापरात असलेले राष्ट्रमाता जिजाऊंचे चित्र तयार करुन ते अधिकृत करुन घेतले आणि ते विधानसभेत लावुन घेतले.अनेक मराठा-कुणबी अधिकाऱ्यांचे प्रश्न सोडवले.हे पाहुन अनेक भाजपचे संघीय आमदार त्यांना विचारायचे "तुमचे पती ब्राह्मणांवर एवढे घसरतात आणि तुम्ही पण त्यांचेच ऐकता ?" यावर रेखाताईंचे उत्तर असायचे "पती हाच परमेश्वर,पतीचे ऐकले पाहिजे हीच आपल्या भाजपची संस्कृती आहे. ती मी पाळली तर काय योग्य नाही का?" हे उत्तर ऐकुन विरोधकांचा चेहरा काळवंडुन जायचा.
● ब्राह्मणी दिशाभुल २) राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले हिंदुत्वद्रोही हिंदुकडे कानाडोळा करतात हे माहीत असल्यामुळे सोलापुरातील शिवस्मारकात दादोजी कोंडदेव यांचे शिल्प यांनी फोडले (अंदाज चुकल्याने त्याचा प्रसादही मिळाला.) परंतु सोलापूर मध्यवर्ती बॅंकेच्या दर्शनी भागात मोठ ेदादोजी कोंडदेवांचे शिल्प असूनही शिवधर्मवाले तिथे वर मान करून पाहत नाहीत. मान वर केल्यास अकलूजकरांकडून मान मुरगाळण्याची भीती त्यांना वाटते.यांचा दादोजीद्वेष सोयीचा आहे,म्हणून हे ढोंगी आहेत.
★ खंडन व उत्तर - RSS उर्फ रामदासी समलैंगिक संघ ही देशाभिमानाच्या गोंडस नावाखाली ब्राह्मणवर्चस्वाचे विष पसरवणारी आणि देशविघातक कटकारस्थाने करणारी जगातील आतंकवादी संघटना आहे.हे जागतिक आतंकवादविरोधी संस्थेच्या पाहणीत दिसुन आले आहे.
http://www.terrorism.com/2014/04/26/rashtriya-swayamsevak-sangh-rss/
त्यामुळे RSS वर बंदी आणण्याची मागणी होत आहे. अशीच मागणी काही दिवसांपुर्वी "शिख फॉर जस्टीस" या भारतीय संस्थेने केली आहे.
शिवचरित्रात घुसवलेला दादु कोंडदेव पुराव्यासहीत हाकलुन काढला.परंतु बाबा पुरंदरेच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरातील शिवस्मारकात जाणुनबुजुन दादु कोंडदेव बसवला गेला होता.त्याचे उद्घाटन करायला देशद्रोही आतंकवादी संघटना RSS चा तत्कालीन म्होरक्या के.सुदर्शन आला असताना शिवप्रेमी महेश चव्हाण या मावळ्याने आपल्या पायातील कोल्हापुरी पायतानाने के.सुदर्शनच्या थोबडा अक्षरशः सुजवुन काढला.(सुदर्शनचा अंदाज चुकल्याने त्याला पोटभरुन प्रसाद मिळाला.) पुढे शिवतंत्र/गनिमी कावा वापरुन मावळ्यांनी शिवस्मारकात घुसलेला दादु फोडुन काढला आणि शिवस्मारक स्वच्छ केले.
सोलापुर मध्यवर्ती बँकेच्या मुख्य दर्शनी भागात अशाच पध्दतीने घुस़वलेला दादु कोंडदेव अकलुजकरांच्याच एका सामान्य कार्यकर्त्याने नुसता हाग्या दम भरताच काढुन टाकला,ही गोष्ट ब्राह्मण कळपाला अजुन माहीतच नाही.यांचे दादुप्रेम पुर्वनियोजीत आहे.
● ब्राह्मणी दिशाभुल ३) अफजलखानाच्या वधाचे चित्र खटकते म्हणून शिवधर्मवाले या चित्राला ते विरोध करतात,ढोंगीपणाचा हा आदर्श नमुनाच होय.
★ खंडन व उत्तर - छत्रपती शिवरायांनी स्वराज्यावर चालुन आलेल्या अफजलखानाचा कोथळा काढला हा इतिहास आहे.तो कुणालाही खटकायची कारणच नाही.परंतु लेखणी हातात असणाऱ्या ब्राह्मण कळपाने तो अर्धाच इतिहास लिहला आहे.शिवरायांनी त्याच ठिकाणी त्यांच्यावर तलवारीने वार करणाऱ्या कृष्णा कुलकर्णीलाही कापुन त्याचा वध केला.हा झाला पुर्ण इतिहास.मराठ्यांच्या हातात लेखण्या आल्यावर मराठ्यांनी तो पुर्ण केला ही गोष्ट ब्राह्मण कळपाला खटकते आहे.कारण कृष्णा कुलकर्णी शिवरायांचा शत्रु असला तरी व शिवरायांनी त्याला ठार केले असले तरी तो ब्राह्मण आहे,म्हणुन इतिहासात कृष्ण्याला नेहमी Soft Corner देण्यात ब्राह्मणी कळप धन्यता मानत होता.
अफजलखानाच्या चित्राचे भांडवल करुन चौथीपासुन लहान मुलांच्या मनावर धार्मिक द्वेषाचे विष पेरणाऱ्यांनी कृष्ण्यासाठी नेहमी शेपुटच घातले आहे. संभाजी ब्रिगेडने सर्वप्रथम "छत्रपती शिवराय अफजलखान व कृष्णा कुलकर्णी या दोघांचा वध करतानाचे चित्र" पुस्तकात छापुन त्याखाली "स्वराज्यावरील राजकीय व सांस्कृतिक दहशतवाद असाच संपवावा लागतो" या ओळी लिहाव्यात ही मागणी केली. परंतु ब्राह्मण कळप हे मुद्दाम लपवुन ठेवतोय.हा ढोंगीपणाचा आदर्श नमुनाच आहे.
● ब्राह्मणी दिशाभुल ४) गणेशोत्सव साजरा करण्याला शिवधर्मवाल्यांचा विरोध आहे.का तर म्हणजे गणपती हा बामणांचा देव आहे. भगवान शिव हा भारतीयांचा मूळ देव आहे, असे काही शिवधर्मवाल्यांचे म्हणणे असते.
ब्राह्मण नसलेल्या शिवाचा मुलगा गणपती ब्राह्मण कसा, हा प्रश्न या शिवधर्मवाल्यांना का पडत नसेल ?
★ खंडन व उत्तर -प्राचीन काळात बहुजन प्रजेचे विविध गण असत.शिवाचे देखील गण होते.अशा प्रकारचे जे गण असत,त्या गणांच्या प्रमुखांना 'गणपति' असे म्हटले जात असे.'गणपति' हे केवळ एका व्यक्तीचे वा देवतेचे नाव आहे,या दृष्टीने गणपतीकडे पाहण्याऐवजी एक अत्युच्च पद या दृष्टीने त्याच्याकडे पाहणे,हा खरा ऐतिहासिक दृष्टीकोन होय.शिवाचे आपल्या गणातील प्रत्येकावर पुत्रवत प्रेम होते.स्वाभाविकच,या गणांचा प्रमुख गणपती हा शिव आणि पार्वती यांचा पुत्र मानला गेला.गणांचे हे जे प्रमुख असत,ते अर्थात मानवच होते.शिव हा स्वतः मूळचा अवैदिक बहुजनांचा नायक असल्यामुळे हे गणपती देखील बहुजनांचे मानवी नेतेच होते.शिवधर्म अशा या गणपतींविषयी अतिशय कृतज्ञतापूर्वक आदर बाळगतो.
गणपतीविषयी नंतरच्या काळात काही जणांनी ज्या कथा जोडल्या आहेत,त्या त्याचे मूळ स्वरुप बदलून टाकणाऱ्या आहेत.शिवधर्म त्या कथा बाजुला सारुन मुळ मानवी स्वरुपातील गणपतीला स्वीकारतो.
(संदर्भ - शिवधर्म गाथा पान ७८,७९ व ८०)
खुद्द शिवधर्म गाथेतील वरील लिखाण ब्राह्मणी कळपाच्या प्रश्न,अफवातंत्र,अपप्रचाराला उध्वस्त करणारे आहे.
● ब्राह्मणी दिशाभुल ५) शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी असे नाव ठेवणाऱ्या,शिवरायांना बालपणात रामायण-महाभारताच्या पराक्रमकथा सांगणाऱ्या जिजामाता नास्तीक होत्या,अशी लोणकढी थापही शिवधर्मवाली मंडळी देतात.
★ खंडन व उत्तर -शिव हा या देशातील बहुजनांचा एक अत्यंत कर्तबगार,विवेकी,संतुलित आणि नितिमान असा प्रेरक पूर्वज होता.तो वैदिक यज्ञसंस्कृतीपेक्षा वेगळ्या प्रसन्न संस्कृतीचा निर्माता होता.शिव आणि पार्वती हे प्राचीन भारतातील अतिशय गुणसंपन्न असे शिवस्वरूप मानवी दांपत्य होते.
(संदर्भ - शिवधर्मगाथा पान ६१)
शिवसंस्कृती ही मातृसत्ताक होती.त्यामुळे महाराजांचे "शिवाजी" हे नाव त्याच शिवकुळातील भगवान शिव,शिवाई अशा शिवसंकृतीशी निगडीत असणाऱ्या प्रेरक महामानव, महानायिकांशी जोडले जाऊ शकते.
राम हा बहुजनांचा प्रेरक असा मानवी पुरुष आहे,अशी शिवधर्माची भूमिका आहे.राम हा विष्णुचा अवतार असल्याचे शिवधर्माला मान्य नाही.कृष्ण हा भारतीयांचा अतिशय आदरणीय असा महापुरुष होता.कृष्ण हा विष्णुचा अवतार असल्याचे शिवधर्माला मान्य नाही.
(संदर्भ - शिवधर्मगाथा पान ७३,७४)
आई जिजाऊंनी शिवरायांना आपल्याच प्रेरक महामानवांच्या पराक्रम कथा,निती,इतिहास सांगितला.म्हणजेच त्यांनी शिवरायांवर शिवकुळातील शिवसंस्कारच केले होते.त्यांनी शिवरायांना वामन,परशुरामाच्या विकृत कपटाचाही इतिहास सांगितला.ब्राह्मणी वैदिक अवतार कल्पना समजावुन सांगितली.जिजाऊंनी वैदिक प्रतिके नाकारल्यामुळे त्या शिवधर्म व्याख्येनुसार खऱ्या आस्तिक होत्या.शिवरायांवर त्यांचे झालेले हेच शिवसंस्कार,चांगले-वाईट,योग्य-अयोग्य निवडण्याची सद्सद्विवेकबुध्दी त्यांनी आपल्या कृतीतुन पदोपदी सिध्द केली.
● ब्राह्मणी दिशाभुल ६) संत तुकाराम महाराजांचे शिवधर्मवाले सदैव गुणगाण करीत असतात.परंतु याचवेळी तुकाराम महाराज हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते हे विसरतात.तुकोबारायांनी नामाचा महिमा सांगितला आहे, हे ते सोयीस्करपणे विसरतात.पंढरी कोट्यवधी वारकरी जातात.आषाढी यात्रेला विरोध करण्याचे धाडस नाही,म्हणून ते वारीला विरोध करीत नाहीत.परंतु वारकऱ्यांमध्येही संतांच्या जातीवर जाऊन दुफळी माजविण्याचा अयशस्वी प्रयत्न मात्र यांनी करून पाहिला आहे.
★ खंडन व उत्तर - विठ्ठल-रुक्मिणी हे आपले एक अतिशय श्रेष्ठ,उमदे,प्रसन्न आणि करणाशील असे प्रेरक श्रध्दास्थान आहे.संत नामदेव-चोखा मेळा वगैरेंपासून संत तुकाराम-गाडगेबाबांपर्यंत असंख्य साधुसंतांनी माणूसकीचा आधार म्हणुन,रंजल्या-गांजल्या लोकांच्या दृष्टीने वात्सल्यमूर्ती म्हणुन ह्रदयाशी कवटाळलेला विठोबा आम्ही मुळीच दुर सारणार नाही.तसे करणे म्हणजे आपल्याच ह्रदयाचा लचका तोडुन टाकण्याचा करंटेपणा केल्यासारखे होईल.पण त्याबरोबरच एक महत्वाची गोष्ट स्पष्ट करणेही आवश्यक आहे. विठोबाशी खरेखुरे देणेघेणे नसलेल्या लोकांच्या तावडीतुन विठोबाला सोडवणे,हेही आपले कर्तव्य आहे. विठोबाच्या मूळ रुपावर प्रस्थापितांनी चढवलेली पुटे,त्याच्या चेहऱ्यावर घातलेले अनिष्ट आणि अनैतिहासिक असे सांस्कृतिक मुखवटे दुर करुन आपण विठोबाच्या मुळ प्रसन्न,प्रेरक,पावक रुपाचाच स्वीकार करीत आहोत.
(संदर्भ - शिवधर्मगाथा पान ८१)
शिवधर्मगाथेतील वरील लिखाण ब्राह्मणी कळपाला विठ्ठलाबाबत शिवधर्माची भूमिका कळण्यासाठी पुरेसे आहे.
वारकरी परंपरेने ब्राह्मणी कर्मकांड नाकारुन भक्तीसाठी नामस्मरण हा सोपा मार्ग सांगितला.इथेच ब्राह्मणी दलाल,बडवे-उत्पातांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो व त्यांचे पितळ उघडे पडते.
महाराष्ट्रात शंभुराजांनी वारीला संरक्षण दिले होते,त्यामुळे शिवधर्माचा विरोध वारीला मुळीच नाही.ही शुध्द ब्राह्मणी धुळफेक आहे.परंतु वारीत घुसुन वारकरी परंपरेचा भाग नसणाऱ्या रामदासालाही वारकरी परंपरेत घुसवु पाहणाऱ्या प्रवृत्तींना मात्र विरोध आहे.
मुळातच ब्राह्मणी कळपानेच बहुजन संतांची विभागणी जातीनुसार केली आहे.नामदेव-शिंपी,गोरा-कुंभार,तुकाराम-कुणबी,रविदास-चांभार,सावता-माळी, नरहरी-सोनार,चोखा-महार, सेना-न्हावी असा बहुजन संतांचा जातीवरुन उल्लेख करताना ब्राह्मण कळपाने त्यांच्या जातीत जन्मलेल्या लोकांची ओळख ज्ञानेश्वर-माऊली,एकनाथ-महाराज,इत्यादि पध्दतीने करुन देऊन स्वतःच ब्राह्मणी जातीवाद पाळल्याचे आणि पोसल्याचे लक्षात येते.संतांमध्ये जातीवरुन दुफळी माजविणारे कोण आहेत ते ब्राह्मणी जातीवादावरुन लगेच कळुन येते.
● ब्राह्मणी दिशाभुल ७) मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे बहुतांश पदाधिकारी हे दरवर्षी गणेशोत्सव मंडळांचेही पदाधिकारी असतात.असो.
मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही काम करतो असे भासवून शिवधर्मवाली मंडळी समाजात स्थान मिळवतात हे खरे आहे.परंतु हिंदू धर्माच्या विरोधातली विचारधारा मात्र मराठा समाज तर सोडाच पण या संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करणाऱ्यांना मान्य नाही,हे त्यांच्या आचरणातून दिसून येते.मराठा समाजातील गरीबी,दारिद्य्र दूर करण्यासाठी काम करण्याची खूपच आवश्यकता आहे,हे कोणीही नाकारत नाही. परंतु यासाठी हिंदू धर्म नाकारण्याची काहीही आवश्यकता नाही.काहीही विधायक कार्य न करता सतत केवळ विद्वेष पसरविल्याने काहीही साध्य होणार नाही हे सांगायला कोणा भविष्यवेत्याची गरज नाही.मात्र नुकतेच तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मराठा तरुणांच्या मनात हिंदूद्वेषाचे (आत्मद्वेषाचे) विष भिनविण्याचा प्रयत्न होत आहे,हे गंभीर आहे.समाजाला मागे खेचणारे आहे.शिवधर्माचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्यांना वाटते की आपण समाजात सुधारणा घडवून आणत आहोत।या ठिकाणी मला स्वामी विवेकानंदांच्या उद्धरणांची आठवण होते.
★ खंडन व उत्तर - मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड ही समाजात विधायक कार्य करणारी चळवळ आहे.असे विधायक कार्य जर गणेशोत्सव मध्ये होत असेल तर त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करायचे सोडुन ब्राह्मण कळप द्वेषबुध्दीने मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड कडे पाहतो.
समाजावर ब्राह्मणी व्यवस्थेचा पगडा आहे याचाच गैरफायदा घेत ब्राह्मण कळपाने हिंदु धर्मात घुसुन धर्माचे मुळ तत्वज्ञानच भ्रष्ट केले.आज ब्राह्मण सांगेल तोच धर्म असे धर्माचे स्वरुप आहे.त्यामुळे समाजही ब्राह्मणी रुढींनाच चिकटुन राहण्याचा प्रयत्न करतो व बदलाला विरोध करतो.धर्मातील हे मुळ निखळ निरामय आनंददायी तत्वज्ञान आज जसेच्या तसे शिवधर्मच्या स्वरुपात समोर आणले आहे.परंतु ब्राह्मणी विचारधारा म्हणजेच हिंदु धर्माची विचारधारा आहे असे सांगत बहुजन समाजाची दिशाभुल ब्राह्मणी कळपाकडुन करण्यात आली.तसेच शिवधर्म विषयी अपप्रचार,अफवा पसरवल्या गेल्या.त्यामुळे समाजात शिवधर्म विषयी नकारात्मक वातावरण निर्माण करण्यात ब्राह्मणी कळप अल्प प्रमाणात यशस्वी झाला.परंतु जसजसे लोक शिवधर्म गाथा वाचु लागले आणि ब्राह्मणी पाखंड पडताळुन पाहू लागले तेव्हा शिवधर्माचा गाभा त्यांच्या लक्षात आला.
शिवधर्म तत्वज्ञान स्वीकारणे म्हणजे हिंदु धर्म नाकारणे नव्हे,ती ब्राह्मणी अफवा आहे.उलट शिवधर्म तत्वज्ञान स्वीकारणे म्हणजेच हिंदु धर्मात ब्राह्मणी कळपाने केलेली अस्वच्छता,कर्मकांड,चमत्कार,भोंदुगीरी,वर्ण-वंश-जाती वर्चस्ववाद दुर करुन धर्माचाच मुळचा गाभा स्वीकारणे होय.
धर्मातील चुकीच्या बाबी दाखवुन देणे म्हणजे विद्वेष नव्हे उलट चांगल्या बदलांना विरोध करणे हा विद्वेष आहे.ब्राह्मणी कळपाने ही विद्वेषी मानसिकता सोडुन द्यावी.त्यातुन त्यांचा वैयक्तिक स्वार्थ साधला जात असला तरी तो समाजासाठी घातक आहे हे सांगण्यासाठी कोण्या विचारवंताचीसुध्दा गरज नाही.
नुकतेच तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मराठा तरुणांच्या मनात कडव्या धर्मांधतेचे (आत्मांधतेचे) विष भिनविण्याचा प्रयत्न होत आहे,हे गंभीर आहे.समाजाला मागे खेचणारे आहे.मराठ्यांना धर्माच्या चौकटीत बंदिस्त करणारे आहे.
शिवधर्म तत्त्वज्ञानावर टीका करणाऱ्यांना वाटते की आपण समाजात सुधारणा घडवून आणत आहोत.परंतु शिवधर्माच्या चांगल्या तत्वज्ञानाबद्दल अफवा,अपप्रचार करुन आपल्या धर्मातील विकृत ब्राह्मणी स्वरुप झाकण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचे आहे.या ठिकाणी मला स्वामी विवेकानंदांच्या उध्दरणाची आठवण होते,
"आजचा हिंदू धर्म हा धर्म नव्हे,हा आहे सैतानाचा बाजार!"
अर्थातच स्वामी विवेकानंदांसारख्या महान जागतिक धर्मअभ्यासकावर हे बोलण्याची वेळ आली यातच धर्मात ब्राह्मणी कळपाने केलेली घाण लक्षात येते.
म्हणुन ब्राह्मणी कळपाने शिवधर्म विषयी अफवा,अपप्रचार,बदनामी करण्याचे धंदे बंद करुन हिंदु धर्मातील ब्राह्मणी घाण स्वतःच साफ करुन लोकांना चांगले तत्वज्ञान द्यावे.
जय शिवराय.
संदर्भ ग्रंथ :
● रेखांकन - ऍड.पुरुषोत्तम खेडेकर
● शिवजयंती : विधानसभेतील चर्चा - रेखाताई खेडेकर
● http://www.terrorism.com/2014/04/26/rashtriya-swayamsevak-sangh-rss/
● http://abpmajha.abplive.in/maharashtra/2015/01/23/article482712.ece/Petition-filed-in-US-court-to-designate-RSS-as-terror-group&sa=U&ei=CzoBVYTlJsvUoASLpIGABg&ved=0CBAQFjAA&usg=AFQjCNEUsVvaoAEeiJTnTENOX7WMtB2jOQ
● १० नोव्हेंबर २००५ ची वृत्तपत्रे
● शिवधर्म गाथा - शिवधर्म संसद
● शोध स्वामी विवेकानंदाचा - डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर.
⛳एक शेतकरी मराठा⛳
===========================
===========================