Monday, 16 March 2015

ब्राह्मण्यग्रस्त अपप्रचाराचा पर्दाफाश

● ब्राह्मण्यग्रस्त अपप्रचाराचा पर्दाफाश ●

दिनांक १६ मार्च २०१५ रोजी Jagdamb Pratishthan ( जगदंब प्रतिष्ठान ) नामक एका पेज वर एक चुकीची व दिशाभुल करणारी अनैतिहासिक पोस्ट वाचण्यात आली.हे पेज अतिब्राह्मण्यग्रस्त विचारांनी प्रभावित झालेले असुन या पेजवरुन इतिहासातील ब्राह्मणी घाण साफ करण्याऐवजी त्याच घाणीची सजावट करुन "खरा इतिहास" म्हणुन लोकांच्यामाथी मारण्याचे ब्रह्मकर्म केले जाते.सदर पेजवरील ती पोस्ट खुप गंभीर असुन गुरुवर्य वा.सि.बेंद्रेंसारख्या महान इतिहासकाराबद्दल सरळसरळ दिशाभुल करणारी आहे.त्यामुळे अशा पाखंडाचे खंडन करणे आवश्यक आहे.........

मुळ पोस्ट :
Jagdamb Pratishthan ( जगदंब प्रतिष्ठान )
जातिवाद बाटग्यानसाठी "श्री छत्रपती संभाजी महाराज" वा.सी.बेन्द्रे ह्यांच्या पुस्तकातला हा पुरावा
जे अस म्हणतात कि त्यांचा official बाप औरंग्या शंभू राजे ला मुसलमान हो म्हणजे तुझा जीव वाचेल अस बोललाच नाही खास त्यांच्या साठी पान क्रमांक ६३९ , फोटो कॉपी पोस्त सोबत आहेच
खालील वाक्य वाचा
( 'मोगलाईत मोठे श्रेष्ठ माणूस होत. त्यानी बादशाहास असे समजाविले की, संभाजीचा जीव रक्षावा.तेणे करून त्याच्या राज्यातील अवघड किल्ले सर्व आपले हाती येतील.ही मसलत औरंगजेबाचे मनास येऊन त्याने संभाजीस निरोप पाठविला की, " तू मुसलमान हो.म्हणजे तुझा जीव वाचेल."त्यावर त्याने उत्तर दिले की, " बादशाहाला सांगावे, जर तू आपली कन्या देशील तर मी बाटेन, तुम्ही दुष्ट मुसलमान लोक.त्यातून तुमची पहिल्यापासून आचरणे दुष्ट आहेत." )

ह्यातून काय सिद्ध होतंय ते पण पहा … आपल्या शंभू राजेच मत आणि त्यांचा दरारा पण बघा
जय भवानी जय शिवराय जय धर्मवीर शंभू राजे
© यश हिरवटे
जगदंब प्रतिष्ठान,
हॅप्पी ग्रुप(महाराष्ट्र राज्य)

★ खंडन व पर्दाफाश -

१) ब्राह्मणी कळपाच्या सानिध्यात राहुन "सोयीचा तो भाग इतिहास म्हणुन सांगायचा आणि बराचसा भाग लपवायचा" ही ब्राह्मणी खोड काही बाटग्या मराठ्यांमध्येही तयार झाली आहे.ब्राह्मणी कळपाची हांजी हांजी करण्याचा नादात आपण कुठल्या गटारपातळीवर आलोत याचे भान या यांना राहिले नाही.या बाटग्यांना कोणी समजवायला गेले तर हे समोरच्याला "यांचा बाप औरंग्या,हे मुसलमान आहेत,हे नवबौद्ध आहेत,हे इंग्रजाळलेले आहेत..." अशा शब्दात कोल्हेकुई करुन समाजात समोरच्याबद्दल राग निर्माण करुन स्वतःसाठी सहानभुती मिळविण्याची केविलवाणी धडपड करतात.त्याचेच हे उत्तम उदाहरण आहे.

२) गुरुवर्य वा.सि.बेंद्रे यांनी सर्वप्रथम शंभुराजांचा खरा इतिहास उजेडात आणला तो त्यांच्या "श्री छत्रपती संभाजी महाराज" या दीर्घ ग्रंथातुनच.त्यात त्यांनी शंभुराजांच्या चरित्र,कार्य,मृत्यु यांचा अभ्यास करुन प्रचलित ब्राह्मण इतिहासकारांनी(?) मांडलेली शंभुराजांची "रगेल आणि रंगेल" ही ओळख पुसुन काढली.

३) वा.सि.बेंद्रेंनी सिध्द केले की औरंगजेबाने शंभुराजांना मुस्लिम बनण्यास सांगणे,शंभुराजांनी औरंगजेबाची मुलगी मागणे,इत्यादि काल्पनिक बाबी पेशवाईतील बखरींमधुन इतिहासात घुसडण्यात आल्या असुन त्यांना ऐतिहासिक आधार नाही.मुळात औरंगजेबाने शंभुराजांना दोनच प्रश्न विचारले होते,
माझे कोणते सरदार तुला फितुर आहेत आणि तुझ्या खजीन्याच्या चाव्या कुठे आहेत ?

४) असे असताना सदर पोस्ट लिहणाऱ्या मुर्खाने या ग्रंथातील मागचा-पुढचा संदर्भ न देता केवळ विशीष्ट चार ओळी दाखवुन त्या ओळी वा.सि.बेंद्रेंच्या नावावर खपवण्याचा नालायकपणाचा कळस केला आहे.पोस्ट लिहणाऱ्याने हिंमत असेल तर या ग्रंथातील पान नंबर ६३८,६३९ व ६४० ही तीनही पाने एकत्र टाकुन दाखवावीत.

५) पान नंबर ६३९ वरील ज्या ओळी "औरंगज़ेब शंभुराजांना मुसलमान हो म्हणुन सांगतो आणि शंभुराजे त्याची मुलगी मागतो" असे सांगुन पुरावा म्हणुन दाखविल्या जात आहेत त्या ओळी वा.सि.बेंद्रंच्या नसुन पंत प्रतिनिधीच्या बखरीतील आहेत.त्या बखरीतील खोटा इतिहास पुसण्यासाठी वा.सि.बेंद्रेंनी या बखरीत कशा प्रकारे काल्पनिक बाबी घुसडल्या आहेत त्या बाबी दाखवल्या आहेत.

६) पान नंबर ६३८ ते ६४० पर्यंत या बखरीतील उतारे देऊन वा.सि.बेंद्रेंनी शंभुराजांना बदनाम करणाऱ्या बाबींचा पुढे समाचार घेतला आहे.

७) पान ६३८ वर वेगवेगळ्या कथांचा वा.सि.बेंद्रेंनी समाचार घेतला आहे.
   पहिल्या उताऱ्यात शंभुराजांनी बादशहाला "तुमची झुलपुकार बेगम आम्हाला द्यावी" असे म्हणल्याचा बखरीत जो उल्लेख आला आहे त्यावर टीका करताना बेंद्रे म्हणतात,"निकृष्ट बखरकारांचा हा एक अजब नमुना आहे.हे बखरकार चरित्रे सांगताना काही जबाबदारीची जाणीव ठेवीत होते असे दिसत नाही.भरमसाठ विधाने करुन कथा सजवावयची एवढाच उद्देश्य त्यांचा असे,असे स्षष्ट दिसते."
   दुसऱ्या उताऱ्यात भा.इ.सं.मंडळाच्या तृतीय संमेलन अवहालात "बाळाजी विश्वनाथाविषयी नवीन माहिती" या बखरीवजा टिपणातील काल्पनिक कथेवर त्यांनी टीका करताना ते म्हणतात,"तिही अशीच भरमसाठ विधाने करुन सजविलेली आहे."
   तिसऱ्या उताऱ्यात त्यांनी ऑर्म(मद्रास) याने लिहलेल्या "शंभुराजे लग्नाच्या वरातीतुन मुलीला पळवुन नेत असल्याच्या" काल्पनिक दंतकथेचा उल्लेख करुन पुढे तिचा समाचार घेतला आहे.

८) पान ६३८ते ६४० वर पंत प्रतिनिधीच्या बखरीतील उतारे असुन यातील
   पहिल्या उताऱ्यात बखरकाराने शंभुराजांना दारुडा ठरवले आहे.
   दुसऱ्या उताऱ्यात तकरीबखानाने कैद केलेल्या शंभुराजांना उंटावर बसवुन वाद्ये वाजवीत भीमा-इंद्रायणी संगमावर नेल्याचे लिहले आहे.
   तिसऱ्या उताऱ्यात औरंगजेब शंभुराजांना मुसलमान व्हायला सांगतो आणि शंभुराजे त्याला तुझी मुलगी दिली तर मी बाटेन असे सांगतात असा उल्लेख बखरकाराने केला आहे.
पान ६४० वर पंत प्रतिनिधीच्या बखरीतील या तिनही उताऱ्यांचे विवेचन करताना वा.सि.बेंद्रे म्हणतात, "येथे दारुचा आरोप प्रथम येतो.कारण ही बखर रामचंद्रपंतांच्या गोटातील असुन ती फारच उशीरा म्हणजेच इंग्रजी काळात लिहिलेली आहे.सत्य आणि काल्पनिक कथानकात चुकुन जे घोटाळे होतात ते असे.

९) एवढ्या स्पष्ट शब्दात गुरुवर्य वा.सि.बेंद्रेंनी शंभुराजांवरील आरोप धुवुन  बखरींचा खोटारडेपणा उघडा केल्यानंतर सुध्दा त्यांच्याच नावाचा वापर करुन शंभुराजांचे चारित्र्य डागाळण्याचा नीच प्रयत्न करणाऱ्यांनी स्वतःच्या धार्मिक खाज-खरुजेवर उपचार करावेत असेच सांगावेसे वाटते.

१०) पोस्ट लिहणाऱ्याने शेवटी "यातुन काय सिध्द होतंय ते पण पहा.." असा प्रश्नही केला आहे.आता या प्रश्नाचे उत्तर त्यानेच द्यावी की यातुन,
चारित्र्यवान शंभुराजे औरंगजेबाच्या मुलीसाठी बाटायची तयारी ठेवत होते हे सिध्द होतंय का ?
निर्व्यसनी शंभुराजे दारुडे होते हे सिध्द होतंय का ?
शंभुराजे लग्नातुन मुली पळवत होते हे सिध्द होतंय का ?
  
छत्रपती शंभुराजांचे नाव घेऊन त्यांच्या नावावर स्वतःच्या पोळ्या भाजणाऱ्यांनी आणि गल्लीबोळात प्रतिष्ठान,ग्रुप काढुन त्याचा फुगा महाराष्ट्र राज्य पातळीवर फुगविणाऱ्यांनी स्वतःचे धार्मिक अहंगंड जोपासताना इतिहासपुरुषांची चुकीची आणि खोटी प्रतिमा मांडण्याऐवजी स्वतःची प्रतिमा सुधारावी.अकलेचे तारे तोडण्याऐवजी इतिहासाचा अभ्यास करावा.सर्वात महत्वाचे म्हणजे ब्राह्मण्यग्रस्त होऊन आपल्याच बांधवांना मुसलमान, नवबौद्ध,इंग्रज म्हणुन हिणवण्याऐवजी स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे ते तपासुन बघावे.
जय शिवराय.

⛳एक शेतकरी मराठा⛳
===========================
===========================

1 comment:

  1. अरे

    खान-दान मदन

    बाटग कोण....??

    ती म्हण् माहीत आहे का "बाटग्या मुल्ला ची बांग मोठी"

    तर शिवरायांचा हिंदू धर्म
    संभाजी महाराजांचा हिंदू धर्म

    सोडून तुम्ही गेला आहात नव्या धर्मात तेंव्हा बाटगे तुम्ही आहात

    आम्ही अजूनही शिवरायांच्या हिंदू धर्माचे पाईक आहोत

    ReplyDelete